एक कार व दोन दुचाकी वाहनासह सुमारे 19 लाखाचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यात अवैध मद्य विक्री व साठवणुकी बाबतची तक्रार विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 या वर करावी.
सोलापूर दि.23 :- राज्य उत्पादन शुल्क सोलापूर कडुन दि.21 ऑगस्ट 2024 ते दि.23 ऑगस्ट 2024 या कालावधित विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, सागर धोमकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जि. सोलापूर भाग्यश्री जाधव, , उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर (मुख्यालय) .एस. आर. पाटील, यांचे मार्गदर्शनखाली, भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आज राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व अवैध दारू वाहतूक याबाबत राबवण्यात आलेल्या मोहिमेमध्ये मुळेगाव तांडा व वडजी तांडा तालुका दक्षिण सोलापूर, पंढरपूर तालुका, माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडी मध्ये हातभट्टी दारू निर्मिती बाबत एकूण 20 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.
या गुन्ह्यामध्ये 28,400 लिटर रसायन जप्त करून नाश करण्यात आले तर 1515 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नाश करण्यात आलेली आहे. या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये 04 आरोपी फरार आहेत, तर 14 जणांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क A व B विभाग, भरारी पथक, पंढरपूर विभाग, माळशिरस विभाग यांनी अवैध हातभट्टी निर्मिती व अवैध दारू विक्री केंद्रांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेमध्ये एकूण 20 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. यामध्ये 20400 लिटर रसायन, 1515 लिटर हातभट्टी दारु जप्त करून नाश करण्यात आलेली आहे. यासह देशी विदेशी व बियर जप्त करण्यात आलेली आहे. तसेच त्यांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये एका चार चाकी वाहनाचा व दोन दुचाकी चा देखील समावेश आहे. या धाडसत्रांमध्ये एकूण रु. 1875040/-इतक्या रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई जगन्नाथ पाटील निरीक्षक, श्री. अविनाश घाडगे, श्री रामचंद्र चवरे, निरीक्षक श्री. पंकज कुंभार, निरीक्षक राउशु, पंढरपूर, सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, धनाजी पोवार, दत्तात्रय लाडके, मानसी वाघ श्रध्दा गडदे, श्री.डी.बी.पाटील दुय्यम निरीक्षक, श्री. जीवन मुंडे, आलिम शेख, होळकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान सर्वश्री. पांढरे, तोगी, गोडिकट, इंगवले, माळी, करचे, वेळापुरे, बेगमपुरे, खंदारे, रशिद शेख, दिपक वाघमारे, संजय नवले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, विकास वडमिले यांनी केली.
राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा सोलापूर यांचेकडून आवाहन करण्यात येते की, अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक, साठवणूक तसेच गोवा राज्य निर्मित मद्य, बनावट मद्याची विक्री वाहतूक अथवा साठयाबाबत माहिती असल्यास त्याबाबतची तक्रार या विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हाट्सअॅप क्रमांक 8422001133 यावर करण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!