सोलापूर:- भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन समारंभ दिनानिमित्त गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण सात रस्ता सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी विहित वेळेपूर्वी राष्ट्रीय पोशाखात ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल