ग्रामदैवत श्री. भगवंत प्रकट दिन म्हणजेच श्री भगवंत महोत्सव २०२२ निमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सभा मंडपाचे भूमिपूजन भगवंत मैदान येथे आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
श्री भगवंत महोत्सव 2022 निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाचे आयोजन भगवंत मैदान येथे करण्यात आले असून सभामंडप उभारणी काम सुरू करण्यात आले आहे. या महोत्सवाचे प्रणेते व मार्गदर्शक मा. आमदार राजाभाऊ राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील मॅडम, माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, श्री भगवंत देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवुन व पूजा करून सभामंडपाच्या बांधणीस सुरुवात करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे पाटील मॅडम, श्री भगवंत देवस्थानचे सरपंच दिलीप बुडूख, मिठूशेठ सोमाणी, मुकुंद कुलकर्णी, सुभाष शेठ लोढा, विलास आप्पा रेनके, सुधिर बापू बारबोले, रावसाहेब मनगिरे मालक, मुन्ना शेठ सोनिग्रा, श्रीधर कांबळे, संतोष सूर्यवंशी उपस्थित होते.
महोत्सव आयोजनात मागील दोन वर्षांपासून खंड पडला होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून धार्मिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणी बार्शीकरांना पहायला मिळणार आहे. सदर कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत