Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > तृतीयपंथी समुदायाला ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा; समाजसेवक सचिन वायकुळे यांची मागणी

तृतीयपंथी समुदायाला ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळावा; समाजसेवक सचिन वायकुळे यांची मागणी

मित्राला शेअर करा

बार्शी येथील तृतीयपंथी मार्गदर्शक तसेच दै. संचार चे उपसंपादकश्री. सचिन मदनराव वायकुळे यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील तृतीयपंथी (पारलिंगी) समुदायाला ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ कसा देता येऊ शकेल याबाबत ईमेल द्वारे मागणी केली आहे.

सचिन वायकुळे हे मागील आठ वर्षांपासून बार्शीसह सोलापूर जिल्ह्यातील तृतीयपंथी (पारलिंगी) समुदाय व वेश्या महिला या घटकांसाठी स्वइच्छेने काम करत आहेत. आजवर महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने तृतीयपंथी (पारलिंगी) यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र मिळवून देण्यात त्यांना यश आलं. परिणामी बार्शीत यंदा लोकसभेला प्रथमच तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्कही बजावला. राज्य शासन व राज्य निवडणुक आयोगाच्या सकारात्मक भूमिकेचा अधिकतर हा परिणाम आहे.

नुकतेच महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा व अंमलबजावणी सुरु केली. पाठोपाठ ‘लाडका भाऊ’ योजनेही घोषणा केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील तृतीयपंथी समुदाय मात्र संभ्रमित आहे.

शासन म्हणून मुख्यमंत्र्यांनी आजवर या समुदायचा गांभीर्याने विचार केला आहे. तसाच विचार या योजनेबाबतीत कसा करता येईल व त्यांना लाभ कसा मिळेल याबाबतीत शासनाने धोरण निश्चित करावे, अशी विनंती वायकुळे यांनी केली आहे. वंचित म्हणून या घटकाडे पाहत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन म्हणून मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, आखलेली धोरणे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला आधार देणारी आहेत. आजच्यास्थितीला ४५ हजारांच्या घरात या समुदायाची संख्या आहे. हे निवेदन बार्शी, सोलापूर व राज्यातील सर्व तृतीयपंथी समुदायाच्यावतीनेच सचिन वायकुळे यांनी दिले आहे.

तसेच प्रातिनिधीक स्वरुपात या सर्वांना आपल्याला भेटता येईल. आपण यासाठी वेळ द्यावा, अथवा यावर काही धोरण निश्चित करावे, अशी विनंती श्री सचिन वायकुळे यांनी केली आहे .