Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > तीन तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा, सोलापूर उपशिक्षणाधिकारी सुलभाताई वठारे यांचे मुख्याध्यापकांना मार्गदर्शन

तीन तालुक्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा, सोलापूर उपशिक्षणाधिकारी सुलभाताई वठारे यांचे मुख्याध्यापकांना मार्गदर्शन

मित्राला शेअर करा

सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती सुलभा ताई वठारे यांचे मुख्याध्यापकांना मार्गदर्शन.
शुक्रवार दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे -बार्शी, करमाळा, माढा या तीन तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपशिक्षणाधिकारी श्रीमती सुलभाताई वठारे होत्या .मुख्याध्यापक सहविचार सभेच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे होते बार्शी चे गटशिक्षणाधिकारी श्री जाधव एल.एस.करमाळा गटशिक्षणाधिकारी श्री बदे ,नगरपालिका प्रशासन अधिकारी श्री अनिल बनसोडे, पर्यवेक्षक न.पा बार्शी श्री संजय पाटील, माढा गटशिक्षण अधिकारी श्री भोंग . इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. मामासाहेब जगदाळे स्मारकास उपशिक्षणाधिकारी सुलभाताई वठारे यांनी भेट दिली


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.प्रमुख पाहुणे श्री जयकुमार शितोळे यांच्या शुभ हस्ते उपशिक्षणाधिकारी श्रीमती सुलभाताई वठारे यांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जी ए.चव्हाण सर यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री जयकुमार शितोळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.नगरपालिका प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी बार्शी पंचायत समिती श्री जाधव सर यांनी मुख्याध्यापकांना संबोधित केले.


अध्यक्षपदावरुन बोलताना श्रीमती सुलभाताई वठारे यांनी मुख्याध्यापकांना दिलेल्या 1 ते 50 विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांच्या अडीअडचणी व शंकांचे निरसन करण्यात आले
यावेळी तीन तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जी .ए. चव्हाण यांनी सुंदर नियोजन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र विद्यालयाचे सहशिक्षक श्री आनंद कसबे सर यांनी केले. मुख्याध्यापक श्री सुरेश गुंड (बावी) यांनी उपस्थितांचे आभार मानले.