Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > धाराशिव (उस्मानाबाद) येथे वैद्यकीय संकुल बाबत गुरुवारी मंत्रालयात बैठक

धाराशिव (उस्मानाबाद) येथे वैद्यकीय संकुल बाबत गुरुवारी मंत्रालयात बैठक

धाराशिव (उस्मानाबाद) येथे वैद्यकीय संकुल बाबत गुरुवारी मंत्रालयात बैठक
मित्राला शेअर करा

धाराशिव येथील वैद्यकीय शिक्षण केवळ एम. बी. बी. एस. पुरतेच मर्यादित न राहता पदव्युत्तर आणि अतिविशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम (सुपर स्पेशलिटी), फिजिओथेरपी, डेंटल, नर्सिंग या सर्व शाखेचे अभ्यासक्रम येथे सुरू करून एक परिपूर्ण अद्ययावत असे वैद्यकीय संकुल विकसित करण्याची अभिनव संकल्पना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडली होती. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. गिरीशजी महाजन यांच्याकडे याबाबत बैठक बोलवण्याची विनंतीही त्यांनी केली होती.

या विनंतीनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. गिरीशजी महाजन यांनी दि.१०/११/२०२२ रोजी दुपारी ०३:०० वाजता धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण संकुल उभारण्याबाबत मंत्रालयात बैठक बोलावली आहे.

या बैठकीत धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व त्या जवळील जलसंपदा विभागाची एकूण ५० एकर जागा या प्रस्तावित संकुलाकडे उपलब्ध करणे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र हे शासकीय तंत्रनिकेतनाच्या उपलब्ध रिकामी जागा स्थलांतरित करणे, १००० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय व २५० पर्यंतचा विद्यार्थी प्रवेश लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाची रचना करणे, महाविद्यालयाची इमारत व परिसराच्या नियोजन करताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा प्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित बृहद आराखडा तयार करण्यास्तव प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करणे आणि या अंतर्गत वैद्यकीय सल्लागाराची तरतूद ठेवणे. या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा होणे अपेक्षित आहे अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

सदरील बैठकीस अपर प्रधान सचिव महसूल व वन विभाग, प्रधान सचिव जलसंपदा विभाग, प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण विभाग, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, जिल्हाधिकारी धाराशिव (उस्मानाबाद), मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव (उस्मानाबाद), प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र धाराशिव (उस्मानाबाद) व इतर संबंधित अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले आहे.