Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > समग्रशिक्षाअभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय, राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे शिक्षण विभागाला निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

समग्रशिक्षाअभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय, राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे शिक्षण विभागाला निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

समग्रशिक्षाअभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय, राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे शिक्षण विभागाला निर्देश - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मित्राला शेअर करा

समग्रशिक्षाअभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील त्यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री सर्वश्री संजय राठोड, संजय बनसोडे, शंभूराज देसाई उपस्थित होते.

यावेळी २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत फेर पडताळणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षक आमदारांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली.