बार्शी तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग खुला आणि महिला (अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती आणि नागरीकांचा मागास प्रवर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांसह) सरपंचांची पदे निश्चित केली आहेत.

त्यानुसार बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक 22/4/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. श्री यशवंतराव चव्हाण सभागृह, नगर परिषद जवळ, बार्शी येथे होणार आहे. तरी बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांना सदर ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना ग्रामसेवक यांनी दिल्या आहेत.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन