सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरण परिसरात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. पुणे जिल्ह्य़ातील तालुक्यामध्येही चांगलाच पाऊस झाला आहे त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातून येत असतो परिणामी या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंत उजनी धरणात साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. मागील महिन्यात उजनी धरण हे मायनसमध्ये गेलं होते. मात्र, आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण हे प्लसमध्ये येईल, अशी माहिती जलसंपदा विभागान दिली आहे.
उजनी धरणातील पाण्याचा फायदा सोलापूर व बारामती परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात होतो. त्यामुळे धरण परिसरातील शेतकर्यांना खुशखबर ! आज ‘ उजनी ‘ धरण प्लसमध्ये येणार व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सुरवातीला मान्सूनपूर्व बसल्यानंतर जून महिन्यातील पहिली काही नक्षत्रे कोरडी गेली त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले मात्र, मागच्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र पावसान हजेरी दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये आंनदाचं वातावरण आहे. मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यानं उजनी धरणात देखील 5 दिवसात उजनी धरणात साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. उजनी धरणात जुलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत उजनी धरणात 7 तारखेपासून साडेपाच टीएमसी पाणी आले आहे. काही दिवसांपूर्वी उजनी धारण हे मायनसमध्ये गेलं होतं. त्यामुळ आज उजनी धरण प्लसमध्ये येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे.
सद्या राज्यभर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला आहे तसेच आठवडाभर सूर्याचे दर्शन झाले नाही त्यामुळे हवेत देखील गारवा निर्माण झाला आहे. काही जिल्ह्यात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद