बार्शी :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र बार्शी यांच्या वतीने इंद्रेश्वर शुगर मिल लि उपळाई बार्शी येथे वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक 10 जुलै 2024 रोजी घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बार्शी चे संचालक बाळासाहेब आंधळकर यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार करिता राबवित असलेल्या योजना व उपक्रम याविषयी माहिती दिली.

सदर वृक्षारोपण इंद्रेश्वर शुगर मिल बार्शी चे जनरल व्यवस्थापन श्री अशोक जाधव, चिप केन मँनेजर हणुमंत जाधव, चिप अकाऊट श्री सचिन शिंदे, डिसलरी मँनेजर सरफीन कोतवाल चिप इंजिनिअर विभीषण खराडे, केमिस्ट बाळासाहेब देशमुख टाईम किपर श्रीराम मैंदाड, मंडळाचे केंद्र सेवक राहुल ओहाळ यांच्या उपस्थितीत पार पडले.
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत