वृक्ष चळवळ गतीमान करण्यासाठी महिलांनाही या चळवळीत सहभागी करण्यासाठी परसबाग व गच्चीवरील बाग स्पर्धेच्या निमित्ताने प्रेरक उपक्रम बार्शीत घेण्यात आला. वृक्षसंवर्धन समिती व जाणीव फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे घेतलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वृक्षांची चळवळ ऑक्सिजन वाढविणारी जशी आहे, तशीच ती शहराचे सौंदर्य खुलवणारीही आहे वृक्षसंवर्धनाचे महत्त्व कोविड काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागल्या नंतर लोकांना समजू लागले परंतु या पूर्वीच बार्शी शहरात व तालुक्यात वृक्षसंवर्धनाची जाणीव ठेवत गेल्या साडे तीन वर्षांपासून वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे व जाणीव फाऊंडेशनचे वसंत हवालदार व सहकारी टीम यांनी काम सुरु केले. सतत नवे उपक्रम राबवत असताना प्रत्येक घटकाला यात सामावून घेता यावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले, आणि यातूनच महिलांसाठी परसबाग व गच्चीवरील बाग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे वितरण कार्यक्रम घेऊन महिलांचा गौरव करण्यात आला. याचवेळी पत्रलेखन स्पर्धाही घेण्यात आली.
या वेळी विजेत्या महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये परस बाग स्पर्धेत कावेरी बागुल, अपूर्वा चव्हाण, स्नेहा मदने, अनिता मोटे, उमा विभुते तर गच्ची बाग स्पर्धेत वृंदा केसकर,निर्मला पाटील, जयश्री अंधारे, अंजली कुलकर्णी, प्रतिज्ञा वायकुळे यांचा गौरव करण्यात आला. विजेत्यांना जी. आर. एम. डेव्हलपर्सच्या वतीने आकर्षक पारितोषिके देण्यात आली. पत्रलेखनात भक्ती कुलकर्णी, श्वेता खोसे, शिवदास भगत, वैभवी महाकर, समृध्दी चौधरी, गायत्री सातारकर या विजेत्यांना सत्कार करण्यात आला. वृक्षसंवर्धन समितीने केलेल्या आवाहनानुसार वाण म्हणून रोपे वाटप केल्याबद्दल रुपाली पोतदार, राहीणी पोतदार, अॅड. राजश्री डमरे-तलवाड, सुलक्षणा नलावडे, गौरी काळे, अश्वीनी गुंड, अर्चना खुने यांचा सत्कार करण्यात आला.
याचवेळी वृक्षसंर्धन समितीच्यावतीने यंदा प्रथमच वृक्षसंर्धन दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. विशेष म्हणजे शहरवासीयांना ही मोफत स्वरुपात देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ, उद्योजक प्रशांत पैकेकर, लेखक सचिन वायकुळे, पत्रकार उमेश पवार, उद्योजक गौतम कांकरिया, आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद , प्रा. शशिकांत धोत्रे, वनविभागाचे साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वायकुळे यांनी दोन्ही संस्थांच्या कार्यावर प्रकाश टाकत महिलांनाही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी जाणीव फाऊंडेशनचे वसंत हवालदार, डॉ. चव्हाण, डॉ. हागरे यांनी, नलावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अतुल पाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृक्षसंर्धन समिती व जाणीव फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ