तयारी ग्रामदैवत भगवंत महोत्सवाची
आज दिनांक १/४ /२२ सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत ही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत महिला युवक जेष्ठ लहान मुले आदी ६५ लोकांनी सहभाग घेतला व मंदिराची चकाचक स्वच्छता करण्यात आली. मंदिराचा काना न कोपरा स्वच्छ करण्यात आला. त्या नंतर आग्निशामकच्या गाडीने मंदिर स्वच्छ धुवून घेण्यात आले. याबद्दल सहभागी सर्व सहकर्यांचे आभार आणि अभिनंदन करण्यात आले.
आग्निशामकची गाडी उपलब्ध करुन दिल्या बद्दल आमदार राजेंद्र राऊत तसेच नगर पालिकेचे योजकांच्या वतीने आभार मानले.
तसेच मंदिर सफाई ची संधी दिल्या बद्दल भगवंत देवस्थान चे आणि या साठी मदत केल्या बद्दल संजयआबा बारबोले आणि धैर्यशिल पाटिल यांचे आभार समितीच्या वतीने मानले
स्वच्छ बार्शी सुंदर बार्शी हरित बार्शी या भावनेतून सामाजिक कार्य करणाऱ्या वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवत बार्शीकर नागरिकांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
More Stories
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार
बार्शीकर धावले नांदेडमधील पूरग्रस्तांच्या मदतीला, पीडित कुटूंबियांना मदत