Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांना राज्यस्तरीय नेचर केअर पुरस्कार

वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांना राज्यस्तरीय नेचर केअर पुरस्कार

५१ हजार रुपये आणि सन्मानपत्र देऊन सत्कार.
मित्राला शेअर करा

नेचर केअर फर्टीलायझर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय नेचर क्लियर पुरस्कार बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीला देण्यात आला. सांगली जिल्ह्यातील विटा येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

वृक्ष संवर्धन समितीने आजपर्यंत केलेल्या वृक्ष लागवड आणि संवर्धन या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. रू. एकावन्न हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कारासाठी राज्यभरातून 80 नामांकने आली होती त्यातून वृक्ष संवर्धन समिती बार्शीची निवड करण्यात आली.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला सेंद्रिय शेती अभ्यासक कृषी भूषण राजेंद्र भट, सिने अभिनेत्री सायली संजीव, नेचर फर्टीलायझर चे अध्यक्ष जयंत बर्वे, कार्यकारी संचालक जयदेव बर्वे, संचालिका कामाक्षी बर्वे, पर्यावरण अभ्यासक आशिष वेले, पुरस्कार निवड समितीचे अरुण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्ष संवर्धन समितीने गेल्या सहा वर्षापासून अविरतपणे सकाळी दोन तास श्रमदान करून साधारण पंचवीस हजार झाडे लावून ती जगवली आहेत. विटा जिल्हा सांगली येथे झालेल्या या कार्यक्रमाला वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.