बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील रहिवासी असलेले श्री. वालचंद बप्पा मुंडे (कृ.उ.बा.बार्शी माजी संचालक) यांची नात व श्री. राहुल वालचंद मुंडे (धनश्री उद्योग समूह ) यांची कन्या कुमारी अपर्णा राहुल मुंडे यांनी आयआयटी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून १००० च्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्रा. शाळा उंबरगे ता. बार्शी येथे झाले. उच्च शिक्षण अकरावी बारावी त्यांनी राजस्थान येथील कोटा येथे शिक्षण घेतले. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आयआयटी परिक्षा दिलेली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण भारतातून जवळपास 20 लाख विद्यार्थी बसले होते. वीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असताना त्यामध्ये संपूर्ण भारतातून 14 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अपर्णा मुंडे या बार्शी तालुक्यातील विद्यार्थिनीने 1000 क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला त्यामुळे संपूर्ण देशात काठिण्य पातळी असलेल्या स्पर्धेच्या परीक्षेत त्यांनी उज्वल असे संपादन केले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतातील वीस लाख विद्यार्थ्यांमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून पुढील शिक्षणासाठी तीला आयआयटी मुंबई या ठिकाणी प्रवेश मिळाला आहे.
अपर्णा मुंडे या विद्यार्थ्यांरनीने मीळवलेल्या उज्वल यश हे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद जि.प.प्रा.शाळा उंबरगे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त भेट ठरणार आहे.
More Stories
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील