Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक, बापूसाहेब चोबे यांनी केले शक्तीप्रदर्शन

उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक, बापूसाहेब चोबे यांनी केले शक्तीप्रदर्शन

उमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक, बापूसाहेब चोबे यांनी केले शक्तीप्रदर्शन
मित्राला शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या बार्शी तालुका दौऱ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेली आढावा बैठक रविवार 13 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात पार पडली. या बैठकीत जिल्हा, तालुका व प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, फ्रंटल विभागाचे अध्यक्ष, प्रवक्ते, निरीक्षक, सेल प्रमुख आदींचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

.

त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपस्थित राहून प्रभावी शक्तीप्रदर्शन केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणि चैतन्य संचारले. बापूसाहेब चोबे यांनी प्रभावी शक्तीप्रदर्शन करीत
बैठकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपस्थित राहून प्रभावी शक्तीप्रदर्शन केले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणि चैतन्य संचारले.

बापूसाहेब चोबे हे हॉटेल राजवाडा या लोकप्रिय हॉटेलचे प्रमुख असून, त्यांचा हॉटेल उद्योगात विशेष दबदबा आहे. तसेच शिवशाही प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करीत सामाजिक क्षेत्रात त्यांचा ठसा आहे. शिवशाही प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेद्वारे त्यांनी विविध उपक्रम राबवले असून, गरजूंसाठी आरोग्य, शिक्षण व रोजगार क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांची एक सामाजिक भान असलेली ओळख निर्माण झाली आहे.

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बापूसाहेब चोबे यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्याशी थेट संपर्क असून, पक्ष बार्शी तालुक्याचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्याच्या तयारीत आहे. त्यांचे कार्यकर्त्यांशी असलेले संबंध, नेतृत्वगुण आणि सामाजिक योगदान पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बार्शी तालुक्यात अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विक्रम सावळे, वाहतूक व कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश चव्हाण, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, महिला प्रदेश सचिव ॲड. सुप्रिया गुंड, कार्यकारी जिल्हाध्यक्ष अक्षय भांड, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुरज ढमढेरे, मा. कार्याध्यक्ष जयवंत देशमुख, समाधान पवार, शहराध्यक्ष मुजम्मील पठाण, तालुका उपाध्यक्ष दत्ता बांगर, युवक उपाध्यक्ष नवाज मुलाणी, शहर कार्याध्यक्ष सुर्या मस्के, मराठा क्रांती मोर्चा प्रतिनिधी विनायक विधान, सभा अध्यक्ष नाना झालटे, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष राशिद शेख, महेश उकरडे, ॲड. सुदर्शन सोनावणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.