Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत सोलापूर जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनादिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच प्राप्त

‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत सोलापूर जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनादिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच प्राप्त

‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत सोलापूर जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींनादिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच प्राप्त
मित्राला शेअर करा

सोलापूर:- दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्येशाने शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असते. वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने दरवर्षी शेकडो दिव्यांगांना शासकीय तथा इतर योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई होते. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्येशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना केंद्र शासनाच्या स्वावलंबन प्रणालीद्वारे निर्गमित दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

हाच दृष्टिकोण लक्षात घेऊन निर्धारित वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष मोहीम मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या संकल्पनेतुन व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सोलापूर जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींची डॉ. विशंपायन स्मुर्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सोलापूर येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञांमार्फत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता तालुका स्तरावर दि. १९ ऑगस्ट २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तपासणी व निदान विशेष मोहिम कार्यक्रमाचे तालुका पातळीवर एकूण २५ शिबिर आयोजन करून एकूण १८ हजार ४२१ दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. प्राथमिक तपासणी व निदान झालेल्या १३ हजार ५२१ पात्र दिव्यांग लाभार्थ्याँना ठराविक ९० दिवसात दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र, स्वावलंबन (UDID) कार्ड, रेल्वे सवलत प्रमाणपत्र, विविध कल्याणकारी योजनांचे माहिती पत्रक, जिल्हा समाज कल्याण विभाग, जि.प., सोलापूर यांच्या विविध योजनांचे माहितीपत्रक, दिव्यांग हक्क अधिनिनियम, २०२६ ची माहिती पत्रक, मा. जिल्हाधिकारी तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., सोलापूर यांचे सुभेच्छा पत्र आणि अभिप्राय देण्यासाठी पोस्ट कार्ड स्पीड पोस्टने घरपोच देण्यात आले.


अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्हयातिल सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी मित्र संस्था आणि जिल्हा प्रशासन यांचे मार्फत तालुका वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्य./प्राथ.), सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण आरोग्य विभागातील सर्व वैद्यकिय तज्ञ, डॉक्टर्स आणि व्यावसायिक तज्ञ, शहरी व ग्रामिण भागातील सामजिक संस्था, त्यांचे पालक, शिक्षक, अंगनवाडी सेविका, आशा वर्कर अशा एकूण ३ हजार ७४२ व्यक्तींना एकूण १६ प्रशिक्षण कार्यशाळाद्वारा प्रशिक्षित करून, त्यांच्या सहकार्याने ज्या व्यक्तींजवळ नविन दिव्यांगत्व प्रमाणपत्र नाहित अशा दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक माहिती प्राप्त करून घेतली.
प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अभियानाच्या दुस-या टप्प्यात जिल्हयातिल ११ हि तालुक्यातील समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या एकूण १ हजार १० बौधिक अक्षम असलेल्या बालकांचे बुध्दीगुणांक (IQ Testing) प्राथमिक तपासणी शिबिर जिल्हयातच्या ब्लाक व क्लस्टर स्तरावत एकूण ४३ विविध ठिकाणी तज्ञ मानसशास्त्रज्ञामार्फ़त दि. ३१ जूलै २०२४ ते दि. १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले.


अभियानाच्या तीस-या टप्प्यात दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञांमार्फत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता तालुका स्तरावर दि. १९ ऑगस्ट २०२४ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत तपासणी व निदान विशेष मोहिम कार्यक्रमाचे तालुका पातळीवर एकूण २५ शिबिर आयोजन करून एकूण १८ हजार ४२१ दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक तपासणी व निदान करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ विशेष मोहिम या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, सोलापूर व डॉ. विशंपायन स्मुर्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सोलापूर आणि मिशन इंस्टिस्टयुट फार र्टेंनिग रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आणि सर्व १३ हजार ५२१ पात्र दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र घरपोच देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर, कुलदीप जंगम यांच्या देखरेखित, मोहिमेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) प्रसाद मिरकले, डॉ. विशंपायन स्मुर्तीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रुत्विक जयकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास द. माने, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, श्रीमती. सुलोचना सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प., सोलापूर च्या श्रीमती मीनाक्षी वाकडे, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संपत्ती तोड़कर, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचाळ, जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख, सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.