Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत लोकसेवा विद्यालय आगळगावचा प्राथम क्रमांक

स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत लोकसेवा विद्यालय आगळगावचा प्राथम क्रमांक

स्वच्छ शाळा - सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत लोकसेवा विद्यालय आगळगाव प्रशालेचा बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक आला प्रशालेच्या या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, शिक्षण संचालक टेमकर, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेचा सन्मान करण्यात आला
मित्राला शेअर करा

स्वच्छ शाळा – सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत लोकसेवा विद्यालय आगळगाव प्रशालेचा बार्शी तालुक्यात प्रथम क्रमांक आला प्रशालेच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, शिक्षण संचालक टेमकर, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेचा सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेब, जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला

लोकसेवा विद्यालय आगळगाव शाळेचे सर्व कर्मचारी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारिणी सदस्य तथा शालेय समितीचे चेअरमन शशिकांत बापू पवार प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा जोगदंड, सहशिक्षक सचिन उकिरडे यांनी पुरस्कार स्विकारला.