महाराष्ट्राच्या दक्षिण – पूर्व भागातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या सोलापूरच्या समन्वित विकासासाठी आज सोलापूर येथे ८,१८१ कोटी रुपये किंमतीच्या व २ ९ २ किमी लांबीच्या १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे खासदार श्री रणजित नाईक निंबाळकर जी, डॉ. श्रीजयसिद्धेश्वर महास्वामी जी, श्री रमेश जिगाजिनगी जी, सोलापूरचे पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे जी , आमदार श्री सुभाष देशमुख जी, श्री विजय देशमुख जी तसेच इतरआमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत लोकार्पण व भूमिपूजन सोहोळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सोलापूर जिल्हा व परिसराला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता असलेले हे रस्ते प्रकल्प सोलापूरकरांचे जीवन सुखी – समृद्ध व विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण व पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागांना शहराशी जोडणे सुलभ होईल. सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोट, पंढरपूर यांसारखी महत्त्वाची देवस्थाने असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी रस्ते नेटवर्क मजबूतीचे महत्त्व मोठे आहे. या बाबी लक्षात घेऊन बांधण्यात आलेले हे महामार्ग प्रकल्प शहरातील व जिल्ह्यातील आध्यात्मिक स्थळांपर्यंत पोहोच सुलभ करतील. शेती मालाची वाहतूकही सुरळीत होण्यास या रस्त्यांमुळे मदत होईल.
सोलापूर जिल्ह्यात वारंवार मोठ्या प्रमाणावर होणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी साधारण २०१६-१७ पासून NHAI च्या माध्यमातून बुलढाणा पॅटर्नच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात अनेक तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. अनेक उपलब्ध जलाशयांचे खोलीकरण करून त्यातून मिळणारी मात, दगड यांचा रस्त्याच्या बांधकामासाठी वापर करण्यात आला. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ७३ गावे पाण्याखाली आली आहेत . परिसरातील पाणी पातळीत ६, ४७८ टीएमसी एवढी वाढ झाली असून ५६१ हेक्टरी क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. २ जलपूर्ती योजनांना या प्रकल्पाचा फायदा झाला असून परिसरातील ७४७ विहिरींचे पुनर्भरण झाले आहे. पंतप्रधानश्री नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली अनेक रस्ते प्रकल्पांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचा चौफेर विकास होत आहे.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सोलापूरच्या दौर्यावर असून 6 मार्ग प्रकल्प उद्घाटन व 4 मार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद