तेर दि. १७ (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाच्या प्रांगणात औदुंबर हरी खोटे या चिमुकल्यांच्या वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक जे. के. बेंदरे, एस. एस. बळवंतराव, बी. डी. कांबळे, एम. एन. देवकते, एम. एल. कांबळे, एस. यु. गोडगे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुभाष कुलकर्णी, पत्रकार हरी खोटे आदि उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल