महाराष्ट्र विद्यालय बार्शी या ठिकाणी कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक योगेश सुभाष उपळकर यांना प्रहार शिक्षक संघटना सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ज्योतिबा – सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार शिवस्मारक सभाग्रह सोलापूर या ठिकाणी देण्यात आला.
हा पुरस्कार शिक्षणाधिकारी सचिन जगताप, मंगेश चिवटे व सचिन नागटिळक या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी उपळकर परिवार व विद्यालयाचे पर्यवेक्षक सुरेश महामुनी,खंडेराव मदने, सुहास वाघमारे, पुष्कराज पाटील, मनोज मिरगणे, हनुमंत चव्हाण, महेश माने,महेंद्र पाटील, सुरेश डिसले, विजय अनभुले, अतुल नलगे,सिद्धेश्वर शिंदे, जयप्रकाश कोरे,पंकज ठाकरे, अनिल लटके, प्रशांत बारंगुळे, योगेश पाटील उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल योगेश उपळकर यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव, एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी,पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन
दत्त प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा