Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > युपीएससी परिक्षा २०२१ “सारथी” संस्थेचे उज्ज्वल यश, १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

युपीएससी परिक्षा २०२१ “सारथी” संस्थेचे उज्ज्वल यश, १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

युपीएससी परिक्षा २०२१ "सारथी” संस्थेचे उज्ज्वल यश, १२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
मित्राला शेअर करा

संघ लोकसेवा आयोग परिक्षा २०२१ चा निकाल नुकताच जाहिर झाला असून यामध्ये सारथी संस्थेमार्फत प्रायोजित संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा २०२०-२०२१ तुकडीतील १२ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे ( भाप्रसे ) यांनी दिली.

सारथी संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग परिक्षा २०२१ च्या पुर्व परिक्षे करिता २५१ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी १८२ विद्यार्थ्यांना व मुलाखतीसाठी ४७ विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्यात आले. या विद्यार्थ्यांची टेस्ट सिरीज , झूम मिटींग व अभिरुप मुलाखतीव्दारे तयारी करून घेण्यात आली. UPSC च्या अंतिम गुणवत्ता यादीत सारथी संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे

▪︎ १ ) शुभम संजय भोसले ( ऑल इंडिया रँक १४९ )
▪︎ २ ) ओमकार मधुकर पवार ( रँक १९४ )
▪︎ ३ ) अभिजीत राजेंद्र पाटील ( रँक २२६ )
▪︎ ४ ) सोहम सुनिल मांढरे ( रँक २६७ )
▪︎ ५ ) रणजीत मोहन यादव ( रँक ३१५ )
▪︎ ६ ) अभिजीत बबन पठारे ( रँक ३३३ )
▪︎ ७ ) विनायक गोपाळ भोसले ( रँक ३६६ )
▪︎ ८ ) शिवहार चक्रधर मोरे ( रँक ४०९ )
▪︎ ९ ) अजिंक्य बाबुराव माने ( रँक ४२४ )
▪︎ १० ) रोशन प्रदीप देशमुख ( रँक ४५१ )
▪︎ ११ ) निरज विजय पाटील ( रँक ५६० )
▪︎ १२ ) आशिष अशोक पाटील ( रँक ५६३ )

या यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अजित निंबाळकर ( भाप्रसे ), श्री. नानासाहेब पाटील ( भाप्रसे ) व व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक काकडे ( भाप्रसे ) यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी काळात सारथी संस्थेमार्फत मोठया प्रमाणात उत्तोमत्त प्रशासकीय अधिकारी होऊन महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासास खूप गती देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अशी माहिती अशोक काकडे व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) , पुणे यांनी दिली