वडार समाजाच्या रणरागिनी मा. श्रीमती सुनिताताई जाधव यांची ‘ मी वडार महाराष्ट्राचा ‘ संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षपदी पूनश्च निवड करण्यात आली.

वडार हदयसम्राट मा. विजयजी चौगुलेसाहेब (संस्थापक,अध्यक्ष ‘मी वडार महाराष्ट्राचा’ ) यांच्या उपस्थितीत, मा. सुरेशजी धोत्रेसाहेब (कार्याध्यक्ष ‘मी वडार महाराष्द्राचा’ ) यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी मा. शंकर चौगुलेसाहेब, मा. तानाजी पोवारसाहेब, मा. शिवाजी चव्हाण साहेब आणि सोलापूर जिल्हयातील समस्त वडार समाज बांधव उपस्थित होते.
ताईसाहेबांच्या पूढील सामाजिक कार्यास आणि सोलापूर येथे होणाऱ्या वडार समाजाच्या महामेळाव्यास मान्यवर व समाजबांधवांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
बार्शी शहर व तालुक्यातील ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व समस्त वडार समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन