वडगावचे युवानेते अंकुश काका मोरे यांच्या संकल्पनेतून व सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त वडगाव सिद्धेश्वर येथे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील भव्य 125 फूट उंचीचा भगवा ध्वजाचे ध्वजारोहण जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास दादा पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तर प्रमुख उपस्थिती मध्ये सोमनाथ आप्पा गुरव माजी नगरसेवक उस्मानाबाद, बाळासाहेब काकडे माजी नगरसेवक उस्मानाबाद, रवी भैय्या वाघमारे माजी नगरसेवक उस्मानाबाद, प्रविण कोकाटे माजी शहराध्यक्ष धाराशिव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
माजी उपसभापती बालाजी गुंजाळ (भूम), पंचायत समिती सदस्य श्री गजेंद्र जाधव, देवळालीचे सरपंच समाधान सातव, हनुमंत देवकते, सहायक अभियंता श्री.मगर, सरपंच बळीराम कांबळे, उपसरपंच जयराम मोरे, गडचिरोलीचे तहसिलदार लक्ष्मीकांत घाटे, सुनील पांढरे, आण्णा पांढरे, बाळासाहेब मोरे,पोपट माळी,विश्वजित गुरव, जयंती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, उपाध्यक्ष सुरज वाडकर,प्रकाश मोरे,सुदर्शन मोरे, बालाजी मोरे, महेश मोरे,सदस्य धीरजकुमार मोरे,पोपट मोरे, चंद्रकांत मोरे,विश्वजीत गुरव,अण्णा पांढरे, सुनील पांढरे,रणजीत मोरे, प्रमोद चादरे, अभिजीत मोरे, महेश मोरे,
अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठाण व सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्यदिव्य ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठान, सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब, संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांनी या ध्वज उभारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद