Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > वडशिंगे येथे के.एन.भिसे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर

वडशिंगे येथे के.एन.भिसे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर

के.एन.भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर
मित्राला शेअर करा

के.एन.भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे वडशिंगे तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी लढुया कोरोनाशी अशी केंद्रीय संकल्पना घेऊन शुक्रवार दिनांक ११ मार्च २०२२ ते गुरुवार दिनांक १७ मार्च २०२२ या सात दिवसाच्या कालावधीत संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार माननीय विनायकरावजी पाटील यांच्या शुभहस्ते शिबिराच्या पहिल्या दिवशी संपन्न झाले. याप्रसंगी या गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. जयश्री मधुकर ठोंबरे, उपसरपंच सौ. विद्या संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिर कालावधीमध्ये विविध विषयावर विविध वक्त्यांची उद्बोधनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच मोफत नेत्रचिकित्सा शिबिर, मोफत पशु आरोग्य तपासणी शिबिर, सनराईज फाउंडेशन, सोनके यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान व प्रबोधनात्मक कार्यक्रम, मोफत एचआयव्ही समुपदेशन व तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरातील स्वयंसेवकांनी गावातील रस्त्यांची, गटारांची, विविध मंदिरांची मज्जिद व जिल्हा परिषद शाळेच्या परिसराची स्वच्छता केली. तसेच गावातील झाडांना आळी करून पाणी घातले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी गावातील ग्रामस्थांनी शिबिरार्थींना धन्यवाद दिले. या शिबिरामुळे गावाला नक्कीच फायदा झाला असल्याचे ते म्हणाले. समारोपप्रसंगी कोरोना योध्दांचा सत्कार आयोजित करण्यात आला.

प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. कांबळे सर, मा. प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील सर, मा. आमदार विनायकराव पाटील, तसेच माढा पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. इत्यादी मान्यवर या शिबिराच्या समारोप प्रसंगी उपस्थित होते. अहवाल वाचन व प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. अतुल कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन लोंढे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मनीषा साळुंखे यांनी केले. याप्रसंगी ग्रामस्थ व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते