Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > वैराग नगरपंचायत निवडणूक चुरशीत भूमकर गटाची सरशी, पहा कोणाला मिळाली किती मते

वैराग नगरपंचायत निवडणूक चुरशीत भूमकर गटाची सरशी, पहा कोणाला मिळाली किती मते

मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्यातील नव्याने निर्माण झालेल्या वैराग नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत राष्ट्रवादी काँग्रेसने १३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे तर भाजपला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.

निरंजन भूमकर आणि त्यांच्या पत्नी तृप्ती निरंजन भुमकर या पती – पत्नीने विक्रमी विजय मिळवला आहे. वैरागकरांनी निरंजन भूमकर यांच्या स्थानिक नेतृत्वाला पसंती दिल्याचे या निकालावरून स्पष्ट दिसत आहे. वैरागकरांनी निरंजन भूमकर यांच्यारुपी स्थानिक , शांत आणि संयमी नेतृत्वाला पसंती दिली. प्रभाग क्रमांक ३ च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तृप्ती भुमकर यांनी ५४८ एवढ्या विक्रमी मतांनी विजय नोंदवला. तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनुप्रिया घोटकर यांनी ११ मतांनी विजय मिळवला.

प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :
▪︎प्रभाग १ : अतुल मोहिते ( राष्ट्रवादी काँग्रेस ३४८ ) मधुकर कापसे ( भाजप २०५ ) अरुण सावंत ( शिवसेना १९४ )
▪︎प्रभाग २ : निरंजन भुमकर ( राष्ट्रवादी काँग्रेस ३६१ ) दत्तात्रय क्षीरसागर ( भाजप २०८ ) विकास मगर ( अपक्ष ३३ )
▪︎प्रभाग ३ : तृप्ती निरंजन भूमकर ( राष्ट्रवादी काँग्रेस ६८४ ) जाहिदा शेख ( भाजप १३६ ) मुमताज शेख ( शिवसेना १२ )
▪︎प्रभाग ४ : अनुप्रिया घोटकर ( राष्ट्रवादी काँग्रेस २३९ ) शोभा पाचभाई ( भाजप १५६ ) कविता सोपल ( शिवसेना २२८ )
▪︎प्रभाग ५ : गुरुबाई झाडमुखे ( राष्ट्रवादी काँग्रेस
३९६ ) रेश्मा शिंदे ( भाजप २५३ ) तेजस्विनी मरोड (काँग्रेस ५३) ▪︎प्रभाग ६ : आसमा मिर्झा ( राष्ट्रवादी काँग्रेस ३३८ ) मुमताज पठाण ( काँग्रेस २८३ ) मनीषा तावस्कर ( २३८ )
▪︎प्रभाग ७ : पद्मिनी सुरवसे ( राष्ट्रवादी काँग्रेस २४४ ) साधना गांधी ( भाजप २२९ ) कुसुम वरदाने ( शिवसेना १३१ )
▪︎प्रभाग ८ : राणी आदमाने ( भाजप ३९३ ) सुप्रिया निंबाळकर ( अपक्ष २९२ ) कविता खंदाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ८९ )
▪︎प्रभाग ९ : जैतुनबी बागवान ( राष्ट्रवादी काँग्रेस ३७० ) दीपक माने ( भाजप २४९ ) मकरंद निंबाळकर ( शिवसेना ) २९७ )
▪︎प्रभाग १० : नागनाथ वाघ ( राष्ट्रवादी काँग्रेस ४२४ ) आप्पासाहेब खेंदाड ( भाजप १५५ ) सतीश खेंदाड ( शिवसेना १०५ )
▪︎प्रभाग ११ : श्रीशैल्य भालशंकर ( भाजप २१९ ) रेश्मा ठोंबरे ( राष्ट्रवादी काँग्रेस २०१ ) आकाश काळे ( शिवसेना १३६ )
▪︎प्रभाग १२ : अक्षय घाटे ( राष्ट्रवादी काँग्रेस ३१८ ) दिलीप गांधी ( भाजप १५२ ) दादासाहेब मोरे ( शिवसेना १७८ )
▪︎प्रभाग १३ : सुजाता डोळसे ( राष्ट्रवादी काँग्रेस २५८ ) रसिका लोंढे ( भाजप १७५ ) संध्याराणी अहिरे ( शिवसेना ६५ )
▪︎प्रभाग १४ : अक्षय कुमार काळोखे ( राष्ट्रवादी काँग्रेस १७८ ) विनोद चव्हाण ( भाजप १४३ ) किशोर देशमुख ( शिवसेना १०३ )
▪︎प्रभाग १५ : जयश्री घोडके ( राष्ट्रवादी काँग्रेस ३४७ ) जयश्री सातपुते ( भाजप १३२ ) शोभा पांढरमिसे ( शिवसेना ४ ९ )
▪︎प्रभाग १६ : अर्चना माने रेड्डी ( भाजप २८६ ) सुलभा मगर ( राष्ट्रवादी ) काँग्रेस २३८ ) शुभांगी पांढरमिसे ( शिवसेना ५२ ) , ▪︎प्रभाग १७ : शाहूराजे निंबाळकर ( भाजप ३३३ ) विनायक खंदाड ( राष्ट्रवादी ) काँग्रेस १८५ ) रवींद्र पवार ( शिवसेना १६ )

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी हेमंत निकम तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून वैराग नगरपंचायतीचा मुख्याधिकारी विना पवार यांनी काम पाहिले.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या, बार्शीत मोठी वाढ