वैराग येथील नव्याने नगरपंचायत आरक्षणाची सोडत प्रक्रिया पुन्हा नव्याने घेण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासाठी प्रक्रिया कालावधी निश्चित केला आहे.
संबंधित नगरपंचायतच्या मुख्याधिकारी स्तरावर सोमवार 15 नोव्हेंबर रोजी ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे . वैराग नगरपंचायतीमध्ये काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण व त्यामधील महिला , सर्वसाधारण आरक्षणाची माहिती स्थानिक नागरिकांच्या माहितीसाठी व त्यावर हरकती मागविण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत वैराग माळशिरस , नातेपुते येथील नगरपंचायतीसाठी काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणाच्या सोडतीवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत . या कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे 19 नोव्हेंबर रोजी सुनावणी प्रक्रिया घेणार आहेत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून अभिप्राय देऊन या हरकत ती 20 नोव्हेंबरपर्यंत विभागीय आयुक्त व नगरपंचायतीच्या प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे .
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ओबीसी आरक्षणाबाबत 22 नोव्हेंबर रोजी अंतिम मान्यता देण्यात येणार आहे . 23 नोव्हेंबर रोजी अधिनियम कलम दहा नुसार ओबीसी आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून अंतिम सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे . यावेळी प्रभाग निहाय एकुण लोकसंख्या व अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या आरक्षणाचा तपशीलही जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम