वैराग पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2023 व सन 2024 मध्ये गहाळ झालेले एकुण 27 मोबाईल अंदाजे किंमत 3,78,000/- रु हे तांत्रीक विषलेश्नाव्दारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस निरिक्षक निवृत्ती मोरे साहेब यांच्या हस्ते परत करण्यात आले.

वैराग पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गहाळ झालेल्या एकुण 89 मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकुण 28 मोबाईल अंदाजे किंमत 3,78,000/- रु. यांचा शोध घेऊन 27 तक्रारदारस परत केले आहेत.
सदर ची कार्यवाही ही मा. पोलिस अधिक्षक श्री सरदेशपांडे साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. यावलकर साहेब, मा. उपविभागिय पोलिस अधिकारी श्री नालकुल साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. निवृत्ती मोरे साहेब, तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे यांचे मार्गदर्शनाने पोकाँ/1142 स्वप्नील शेरखाने, पोकॉ/1403 सुखदेव सलगर, तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोकॉ/1182 रतन जाधव, यांनी केली आहे व तक्रारदार यांना विना विलंब परत केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या पुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलिस स्टेशन येथे मोबाईल चे संपूर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदवावी असे अवाहन मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. निवृत्ती मोरे साहेब यांनी केले आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ