Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > वर्गणी नको पुस्तक हवे हा उपक्रम घेत सुमित खुरंगळे यांनी दिली स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला दिली पुस्तके

वर्गणी नको पुस्तक हवे हा उपक्रम घेत सुमित खुरंगळे यांनी दिली स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला दिली पुस्तके

वर्गणी नको पुस्तक हवे हा उपक्रम घेत सुमित खुरंगळे यांनी दिली स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला दिली पुस्तके
मित्राला शेअर करा

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त पैशाच्या स्वरूपात देणगी न घेता पुस्तकांच्या स्वरूपात देणगी घेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना पुस्तकांचे वाटप करून, मा. सुमित खुरंगळे यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची वैचारिक जयंती साजरी केली.

व्हिडीओ

त्यांनी समाजापुढे एक आदर्श उपक्रम ठेवला. या उपक्रमाचा शेवट म्हणुन आज सुमित खुरंगळे यांनी बार्शीतील स्वामी विवेकानंद अभ्यासिका चे संस्थापक श्री सोमनाथ गूल्हाने सर यांच्या अभ्यासिकेला भेट देत सर्व बार्शीकरांकडुन मिळवलेली पुस्तके सोमनाथ गुल्हाने सर यांच्या अभ्यासीकेला देण्यात आली. याप्रसंगी सुमित खुरंगळे, ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी तसेच श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी शाळेचे सहशिक्षक गणेश कदम सर, धर्मरक्षक प्रतिष्ठान बार्शीचे गणेश रावळ (गळीतकर) तसेच स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील विद्यार्थीदेखील उपस्थीत होते.