वाशी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची वाशी तालुका कार्यकारणी ( ता. २६ ) रोजी स्थापन करण्यात आली.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला वाशी तालुका कार्यकारणी अध्यक्षपदी श्री.शिवाजी अण्णा आवारे मुख्याध्यापक न्यू हायस्कूल घाट पिंपरी, उपाध्यक्ष श्री.संदीप सुभाषराव ढोले सहशिक्षक गणेश विद्यालय तेरखेडा,सचिव श्री.सिद्धेश्वर बालासाहेब शहाणे सहशिक्षक महात्मा फुले विद्यालय पारगाव, सहसचिव श्री.अरुण नारायण देशमाने सहशिक्षक कै. सत्यवती जोगदंड विद्यालय हातोला ,कोषाध्यक्ष श्री. एन.बी.सुर्यवंशी सहशिक्षक जय भवानी विद्यालय पारा,प्रसिद्धी विभाग प्रमुख श्री. सचिन बाळासाहेब छबिले सहशिक्षक छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी, सदस्य श्री .एच. एम.मोरे सहशिक्षक लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालय सारोळा मांडवा यांची निवड करण्यात आली.

कार्यकारणीची निवड करण्यासाठी जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष श्री.डी. के .कुलकर्णी ,श्री. पी.एस.देवसाळे , श्री.डी.एस.भोसले, श्री.पी.डी. गायकवाड व श्री.सर्वज्ञ सर यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष श्री. डी.के.कुलकर्णी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शालेय अभ्यासक्रमात सोबतच विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्यासाठी कथामाले द्वारे नियोजित उपक्रमा संबंधी माहिती दिली.
या सर्व नूतन कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.सुनील पुजारी ,जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री. डी.के.कुलकर्णी, श्री.पी.एस.देवसाळे, श्री.डी.एस. भोसले, श्री. पी.डी.गायकवाड व श्री. सर्वज्ञ सर यांनी अभिनंदन करून पुढील कथामालेच्या कार्यासाठी व उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर