क्रीडा विभाग 20 सप्टेंबर 2022 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेच्या वार्षिक नियोजन समितीची बैठक आयोजित करणार आली. या बैठकीत विद्यापीठ पदक विजेत्या खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
माननीय कुलगुरू प्रा. प्रमोद येवले सर यांच्या शुभहस्ते पश्चिम विभागीय अखिल भारतीय / खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पदके मिळविणारे आणि 2019 – 2020 या वर्षासाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांचाही सन्मान करण्यात आला. या सत्कार समारंभात बार्शी येथील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रिडा विभाग विद्यार्थी खेळाडू माने आदित्य गणेश या पदक विजेत्या खेळाडूचा सत्कार करण्यात आला.

आदित्य माने याने 3019 -20 वेस्ट झोन कांस्य पदक व क्रिडा महोत्सव रौप्य पदक प्राप्त केले आहे. विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहोळा संपन्न झाला.
More Stories
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार