येत्या 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी असेल, त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाईल. यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार किंवा जास्त विषय – इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिक; प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत. प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे, फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे.
बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले की, “सध्या इयत्ता पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे 6 वर्षांचा आहे, त्याच्या बॅगेत किमान 830 ग्रॅम इतके पाठ्यपुस्तकांचे वजन असते. यामध्ये पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे वजन जोडल्यास बॅगेचे वजन 1 किलोग्रॅमच्या पुढे जाते. परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन 210 ग्रॅमपर्यंत कमी होते. प्रायोगिक तत्त्वावर, 488 मॉडेल स्कूलमध्ये पुस्तके सादर करण्यात आली आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शिक्षकांनी सुद्धा केले निर्णयाचे कौतुक
पुस्तकांची आकर्षक मांडणी रंगीत चित्रांचा वापर व मांडणी मुळे विद्यार्थ्यांना वारंवार हाताळायला आवडतील. येत्या वर्षी म्हणजेच ‘2022-23 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक आणले जाईल. इतर वर्गांची म्हणजेच पहिली ते सातवीची सुद्धा या पद्धतीची मॉडेल पुस्तके pdf स्वरुपात बालभारतीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत
बालभारती अधिकृत वेबसाईट balbharti ebook
http://ekatmik.balbharati.in/ebookek.aspx
परंतु ती अभ्यासक्रमात येत्या वर्षी येणार की टप्प्यांमध्ये ते मात्र स्पष्ट झाले नाही
नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर त्यात आवश्यक बदल देखील करण्यात येतील. आम्हांला हे पाठ्यपुस्तक वापरणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद आणि प्रतिक्रिया मिळाली आहे.” असे ते म्हणाले.
दुर्गम भागातील व खेड्यांतून दररोज शाळेसाठी शहरात जाणार्या मुलांसाठी, जिथे शाळा खूप दूर आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी एसटीने प्रवास करावा लागतो अश्या विद्यार्थ्यांना जड पिशव्या घेऊन लांब अंतर जावे लागते.या पुस्तकांमधे दप्तराचे ओझे नक्कीच कमी होणार आहे आहे. पुस्तकात अनेक नवीन उपक्रमही खूप उपयुक्त आहेत.एकंदरीत पुस्तकातील उपक्रम हे विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात दैनंदिन जीवनात उपयोगात येतील.
More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश