विज्ञानातील संशोधनाबरोबर भाषेतील संशोधनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.

विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुल आणि संगमेश्वर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
‘हिंदी भाषा आणि साहित्य : स्थिती, गती व प्रक्रिया’ या विषयावर त्यांनी आपले मार्गदर्शक विचार व्यक्तकेले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी होते. प्राचार्या डॉ. शोभा राजमान्य, डॉ. गिरीश काशीद, डॉ. प्रभाकर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भाषेतील संशोधन हे केवळ ग्रंथालयीन नसते तर त्याला विविध आयाम असतात. ग्रंथालयीन संशोधनासोबत क्षेत्रीय संशोधनही महत्त्वाचे असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले