पानगाव, ता. बार्शी लोकसेवा आयोगमार्फत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस परीक्षेत पानगाव (ता. बार्शी) येथील दोघांनी घवघवीत यश मिळवले असून, यामुळे पानगावच्या शिरपेचात आणखी दोन मनाचे तुरे लागले आहेत. मीनाक्षी महादेव (अप्पा) जमदाडे हिने या परीक्षेत ईडब्ल्यूएस प्रवर्गातून मुलीत उत्तुंग यश मिळवले आहे. तर अनिकेत नरसिंग काळे याने याच परीक्षेत यादीत २६ व्या क्रमांकाने यश मिळवले आहे.

या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाल असून, यामध्ये दोघांनी चमकदार कामगिरी केली आहे. मीनाक्षी हलदव (अप्पा) जमदाडे हिचे प्राथमिक शिक्षण पानगाव येथे तर माध्यमिक शिक्षण संत तुकाराम विद्यालय, पानगाव येथे झाले आहे त्यांचा या यशाबद्दल संत तुकाराम विद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले, तसेच तिने शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव येथून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला असून, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून पदवी घेतली
आहे. त्यानंतर तिने एमपीएससीची तयारी केली. विशेष म्हणजे सेल्फ स्टडी करून पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याचे तिने आवर्जून सांगितले.
याचबरोबर अनिकेत नरसिंग काळे याचे देखील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पानगाव येथे झाले असून, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथून बारावी पूर्ण केली आहे. बारामती येथून अनिकेतने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
दरम्यान त्याने ही एमपीएससी परीक्षा देऊन हे यश मिळवले आहे.
पानगाव येथे अनिकेतची निवड झालेचे कळताच ग्रामस्थ आणि मित्रांनी त्याची गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला. तर मीनाक्षी जमदाडे हिच्या घरी मुलीच्या यशाने सर्वजण आनंदून गेले आहेत. आपल्या शिक्षणासाठी आई वडील आणि परिवाराच्या कष्टाचे चीज केल्याच्या भावना यावेळी दोघांनी बोलावून दाखवल्या आहेत.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ