बार्शी बसस्थानकावरून पुण्यासाठी विनाथांबा एसटी बस सेवा होणार आहे. ही बससेवा बसस्थानकातुन दि.१५.०३.२०२४ रोजी पासुन पुण्यासाठी विनाथांबा, विनावाहक एसटी बससेवा सुरू करण्यात येत आहे.

त्यामुळे बार्शीतील प्रवाशांना कमी वेळात पुण्यात पोहचता येईल. सकाळी ०६ वाजल्या पासुन ते रात्री २२.०० वाजेपर्यंत दर एका तासाला ही बस जाणार आहे. तसेच पुण्याहुन ही परतीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. जाताना व येताना कुर्डवाडी, टेभुर्णी व हडफसर हे थांबा असणार आहेत. सध्या बार्शी ते पुणे प्रवासासाठी पाच ते साडेपाच तास लागत असून विनाथांबा यसमुळे प्रवाशांची एक तासाची बचत होणार आहे.
त्यामुळे बार्शीहुन एसटीने पुण्याला जाणा-या प्रवाशांचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर