विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने दि. २५ रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री अनिरुद्ध पंडित यांनी संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली.

याप्रसंगी बजरंग दलाचे नितीन महाजन, जिल्हा अध्यक्ष हभप अभिमन्यू डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमचे प्रास्ताविक बापूसाहेब कदम यांनी केले. कार्यक्रमास बजरंग दलाचे जिल्हा संयोजक दीपक मुथा, हर्षल नांदुरे, योगेश सलगर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये प्रखंड स्तरावरील कार्यकर्त्यांना दायित्व प्रदान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग राऊत, सौरभ वाघमारे , दीपक ढगे, योगेश खजानदार, कृष्णा कदम, रणजीत निलाखे, शेखर राऊत, सागर क्षीरसागर, अजय कांबळे, प्रेम मोहिते, केशव कोरे, अमर शुक्ला परिश्रम घेतले.
.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल