विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य (धाराशिव) व मनगिरे परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने शिवैक्य सौ. लक्ष्मीबाई मधुकर मनगिरे यांच्या पुण्यस्मरणा निमीत्त दिनांक २२ जुलै २०२२ रोजी शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

भारतातील सगळ्यात लहान (२१ वर्षे ) कमी वयाची महाराष्ट्रतून, धाराशिव जिल्ह्यातील, भूम तालुक्यातील, ग्रामीण भागातील पखरुड येथील नवनियुक्त चिफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर कू. पुजा आश्रुबा चव्हाण यांनी शिवैक्य सौ. लक्ष्मीबाई मधुकर मनगिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ, आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पूजन व श्रीफळ वाढवून रक्तदान शिबीराचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांचा व आई-वडिलाचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर मा. पुजा आश्रुबा चव्हाण नवनियुक्त चिफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर झाल्या बद्दल त्यांच्या आई आईवडीलसह विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र (धाराशिव) व मनगिरे परिवाराने त्यांचा सत्कार केला. सोमनाथ सोमनाथ कोकाटे जिल्हा समन्वयक विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य (धाराशिव), नगराध्यक्ष मा. श्री संजय (नाना) गाढवे (गटनेते) न. प.भूम, दिलीप शाळू जिल्हा प्रमुख शिवसेना मा.श्री.किरन जाधव, डॉ.सुप्रिया शेटे, डॉ. श्री.कोल्हे मनोज, डॉ. रेणुका बिराजदार, मधुकर मनगिरे, सिध्देश्वर मनगिरे, उमेश मनगिरे, डॉ. खोले, डॉ. अंबुरे, प्रल्हाद आडागळे, अनिल मोटे सर, अशोक तोडकर, नातेवाईक, सोलापूरे काका, ओम महाराज, कैलास घेवारे , सर्व मित्र परिवार व समाजबांधव इत्यादी उपस्थित होते. रक्त संकलन भगवंत ब्लड बँक बार्शी यांनी केले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार