पराडा ; नूतन वर्ष स्वागताचे औचित्य साधून परंडा तालुक्यातील शिवकृपा मंगल कार्यालय, मुगांव येथे विश्वजन आरोग्य सेवा समिती, धाराशिव व विश्व मराठा संघ धाराशिव आणि पोलिस स्टेशन,आंबी यांच्या सयुंक्त विद्यामाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर महाराष्ट्र राज्य विश्वजन आरोग्य सेवा समिती संस्थापक अध्यक्षा छायाताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मा दिनकर डंबाळे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भूम यांच्या हस्ते करुन सुरुवात केली आले.
यावेळी रक्तद सकंलन सह्याद्री ब्लड बॅक उस्मानाबाद यांनी केले सदर शिबिरास जि.प. उस्मानाबाद उपाध्यक्ष धनंजय सावंत, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग भुम दिनकर डंबाळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष खांडेकर, विश्वजन आरोग्य सेवा समिती जिल्हा समन्वयक सोमनाथ कोकाटे, परंडा आरोग्यदुत राहुल शिंदे, परंडा तालुका आरोग्य सदस्य रविंद्र तांबे, परंडा आरोग्य समन्वयक तानाजी कासारे, परंडा तालुका समन्वयक साजीद शेख, भुम तालुका आरोग्य समन्वयक किशोर गटकळ, योगिताताई मिसाळ महिला तालुका अध्यक्ष भुम, तालुकाध्यक्ष परंडा रावसाहेब काळे आदी सह पोलिस कर्मचारी व पोलिस पाटील उपस्थित होते.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी