दि.30 ऑगस्ट 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण 37 लाख 63 हजार 789 इतकी मतदारांची संख्या
*वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी करावी.
सोलापूर, दिनांक 24:-सोलापूर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली असून 37 लाख 63 हजार 789 इतकी एकूण मतदार संख्या आहे. या अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करावी. बहुतांश वेळा मतदानाच्या दिवशी आपले नांव मतदार यादीमध्ये नाही अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते, अशी तक्रार येऊ नये यासाठी नागरिकांनी आपली नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याचेबाबतची खात्री करावी. तसेच ज्या नागरिकांची अजूनही मतदार यादीमध्ये नावे नसतील त्यांनी निरंतर प्रक्रीयेमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
दिनांक 6 ऑगस्ट 2024 च्या प्रारुप मतदार यादीमध्ये एकुण 36 लाख 92 हजार 409 इतकी असून यामध्ये पुरूष 19 लाख 8 हजार 146, महिला 17 लाख 83 हजार 966 व इतर 297 मतदाररांचा समावेश होता. दि.30 ऑगस्ट 2024 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकुण 37 लाख 63 हजार 789 इतकी असून यामध्ये पुरूष 19 लाख 35 हजार 979, महिला 18 लाख 27 हजार 508 व इतर 302 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये 75 हजार 824 इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे.
*244 करमाळा- मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 347, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 67 हजार 722, महिला 1 लाख 52 हजार 85, इतर 11, एकुण 3 लाख 19 हजार 818, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 69 हजार 390, महिला 1 लाख 54 हजार 633, इतर 12, एकुण 3 लाख 24 हजार 35, एकुण वाढीव मतदारांची संख्या 4 हजार 737.
*245 माढा – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 355, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 78 हजार 637, महिला 1 लाख 60 हजार 711, इतर 02, एकुण 3 लाख 39 हजार 350, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 80 हजार 547, महिला 1 लाख 63 हजार 997, इतर 03, एकुण 3 लाख 44 हजार 547, एकुण वाढीव मतदारांची संख्या 5 हजार 339.
*246 बार्शी- मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 333, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 67 हजार 439, महिला 1 लाख 55 हजार 772, इतर 42, एकुण 3 लाख 23 हजार 253, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 69 हजार 100, महिला 1 लाख 58 हजार 516, इतर 41, एकुण 3 लाख 27 हजार 657, एकुण वाढीव मतदारांची संख्या 4 हजार 719.
*247 मोहोळ (अ.जा) – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 336, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 69 हजार 125, महिला 1 लाख 52 हजार 265, इतर 08, एकुण 3 लाख 21 हजार 398, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 70 हजार 840, महिला 1 लाख 55 हजार 151, इतर 08, एकुण 3 लाख 25 हजार 999, एकुण वाढीव मतदारांची संख्या 4 हजार 762.
*248 सोलापूर शहर उत्तर – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 289, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 57 हजार 378, महिला 1 लाख 57 हजार 573, इतर 44, एकुण 3 लाख 14 हजार 995, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 60 हजार 198, महिला 1 लाख 62 हजार 425, इतर 45, एकुण 3 लाख 22 हजार 668, एकुण वाढीव मतदारांची संख्या 8 हजार 199.
*249 सोलापूर शहर मध्य – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 304, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 63 हजार 835, महिला 1 लाख 66 हजार 375, इतर 50, एकुण 3 लाख 30 हजार 260, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 67 हजार 662, महिला 1 लाख 71 हजार 894, इतर 52, एकुण 3 लाख 39 हजार 608, एकुण वाढीव मतदारांची संख्या 9 हजार 947.
*250 अक्कलकोट – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 390, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 88 हजार 758, महिला 1 लाख 75 हजार 903, इतर 40, एकुण 3 लाख 64 हजार 701, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 92 हजार 819, महिला 1 लाख 81 हजार 676, इतर 41, एकुण 3 लाख 74 हजार 536, एकुण वाढीव मतदारांची संख्या 10 हजार 171.
*251 दक्षिण सोलापूर – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 362, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 87 हजार 972, महिला 1 लाख 74 हजार 973, इतर 41, एकुण 3 लाख 62 हजार 986, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 91 हजार 610, महिला 1 लाख 80 हजार 905, इतर 38, एकुण 3 लाख 72 हजार 553, एकुण वाढीव मतदारांची संख्या 10 हजार 566.
*252 पंढरपूर – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 357, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 85 हजार 730, महिला 1 लाख 74 हजार 544, इतर 23, एकुण 3 लाख 60 हजार 297, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 87 हजार 889, महिला 1 लाख 77 हजार 810, इतर 26, एकुण 3 लाख 65 हजार 725, एकुण वाढीव मतदारांची संख्या 5 हजार 874.
*253 सांगोला – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 305, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 65 हजार 242, महिला 1 लाख 50 हजार 603, इतर 05, एकुण 3 लाख 15 हजार 850, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 67 हजार 777, महिला 1 लाख 54 हजार 458, इतर 05, एकुण 3 लाख 22 हजार 240, एकुण वाढीव मतदारांची संख्या 6 हजार 619.
*254 माळशिरस (अ.जा) – मतदार संघ मतदार संघाचा क्रमांक- एकुण पोलिंग स्टेशन 345, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 1 लाख 76 हजार 308, महिला 1 लाख 63 हजार 162, इतर 31, एकुण 3 लाख 39 हजार 501, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 1 लाख 78 हजार 147, महिला 1 लाख 66 हजार 43, इतर 31, एकुण 3 लाख 44 हजार 221, एकुण वाढीव मतदारांची संख्या 4 हजार 891.
*एकुण – एकुण पोलिंग स्टेशन 3 हजार 723, दि.6 ऑगस्ट 2024 च्या यादीनुसार पुरूष 19 लाख 8 हजार 146, महिला 17 लाख 83 हजार 966, इतर 297, एकुण 36 लाख 92 हजार 409, 30 ऑगस्ट 2024 च्या अंतीम यादीनुसार पुरूष 19 लाख 35 हजार 979, महिला 18 लाख 27 हजार 508, इतर 302, एकुण 37 लाख 63 हजार 789, एकुण वाढीव मतदारांची संख्या 75 हजार 824.
*सोलापूर जिल्ह्यातील वयोगटानुसार आकडेवारी- 18-19 अनुमानीत संख्या 1 लाख 95 हजार 565 टक्केवारी 5.78%, अतिम रोल 23 जोनवारी 2024 पर्यंत 44 हजार 726 टक्केवारी 1.25%, दुसरा एसएसआर रोल 6 ऑगस्ट 2024 पर्यंत 67 हजार 716 टक्केवारी 1.83%, फायनल रोल 23 जानेवारी 2024 पर्यंतची संख्या 82 हजार 686, 2.20%.
*सोलापूर जिल्ह्यातील वयोगटानुसार आकडेवारी- 20-29 अनुमानीत संख्या 9 लाख 45 हजार 505 टक्केवारी 27.93%, अतिम रोल 23 जोनवारी 2024 पर्यंत 6लाख 90 हजार 253 टक्केवारी 19.29%, दुसरा एसएसआर रोल 6 ऑगस्ट 2024 पर्यंत 7 लाख 43 हजार 309 टक्केवारी 20.13%, फायनल रोल 23 जानेवारी 2024 पर्यंतची संख्या 7 लाख 73 हजार 843, 20.56%.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये एकूण 3 हजार 617 मतदान केंद्र होती. यामध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करून 124 मतदान केंद्राची नव्याने वाढ होवून मतदान केंद्राची संख्या 3 हजार 723 झालेली आहे. एकुण 3 हजार 723 मतदान केंद्रांपैकी शहरी 1 हजार 177 व ग्रामीण भागामध्ये 2 हजार 546 मतदान केंद्राचा समावेश आहे.
*मतदारांनी ऑनलाईन नोंदणी करावी-
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकतात. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असलेल्या अथवा काही दुरूस्ती असल्यास संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत कळविण्यात येत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!