सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बार्शी २४६ बाशी विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान कार्डला आधार कार्ड जोडणेकामी दि.१९ / ०९ / २०२२ रोजी राज्यव्यापी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर दिवशी मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी एल ओ ) हे मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.
तरी मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपले व आपल्या कुंटुबांचे मतदान कार्ड आधार कार्डला जोडून घ्यावे असे आवाहन सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बार्शी २४६ बाशी विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले