सध्या कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्रातील वीजनिर्मितीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना आणि इतर 12 होयड्रो प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जर हीच परिस्थिती राहीली तर शहरी/ग्रामिण भागात आठ तासाचे लोडशेडींग करावे लागेल.त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करा, अशी विनंती महावितरणने केली आहे.दरम्यान, देशात कोळशाची कमतरता आणि वीज संकटाच्या चर्चांवर सरकारने वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निराधार असल्याचे म्हटले आहे.
खणी कर्म संचालक पुरुषोत्तम जाधव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की,राज्यातल्या औष्णिक विज निर्मिती केंद्राचा कोळसा पुरवठा याचे नियंत्रण त्यांच्यामार्फत होते. जाधव यांच्या मते इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात परिस्थिती बरी आहे. गेल्या तीन दिवसापासून पुरवठा पुन्हा सुरळीत होवू लागला आहे. कोळश्याअभावी काही प्रकल्प बंद ठेवावे लागलेत. त्याला कोळश्याचे नियोजन म्हणतात.सध्या या नियोजनामुळे दिड हजार मेगा वॅटची तुट आहे.परंतु सध्या कोळसा पुरवठा सुरळीत होत असल्याने ती तुट भरली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी पॅनिक व्हावे अशी स्थिती नाही.केंद्रीय सचिव रोज दुपारी 4 वाजता आढावा घेत असतात.तिथे नोंदवल्या प्रमाणे पुढील 24 तासात कोळसा पुरवला जातो. या वर्षी निश्चित यापूर्वी कधी आली नव्हती अशी स्थिती झाली. स्टॅाक अतिशय कमी झाला होता.त्याचे मुख्य कारण सप्टेबरमध्ये अचानक वीज मागणी वाढली आणि पुरवठा विस्कळीत झाला होता.सध्या शासकीय युनिटमधले उत्पादन कमी झाले आहे. पण मॅनेज होत आहे. सणाचा काळा बघता मागणी वाढली तर लोडशेडिंग होवू शकेल. गेल्या तीन दिवसात ८० लाख ते १ लाख १० हजार टन पुरवठा होत आहे. तो दिड लाख टन हवा. तो सुरळीत झाला तर दिड हजाराची तुट कमी होईल, असं जाधव यांचं म्हणणं आहे.
कोळशाच्या तुटवड्यामुळे 13 युनिट बंद कोळशाच्या संकटामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणाला वीज पुरवठा करणारे वीज केंद्रांचे एकूण 13 युनिट रविवारी बंद झाले.यामुळे राज्यात 3330 मेगावॅट वीज पुरवठा ठप्प झाला आहे.यामुळे ग्राहकांना कमी वीज वापरण्याचे आवाहन केले जात आहे. MSEDCL ने ग्राहकांना मागणी आणि पुरवठा यांचं संतुलन राखण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत वीजेचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला आहे.चंद्रपूर,भुसावळ आणि नाशिकचे 210-210 मेगावॅट,पारस 250 मेगावॅट आणि भुसावळ आणि चंद्रपूरचे 210-210 मेगावॅट युनिट बंद करण्यात आले आहेत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद