Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > WE MARATHA सामाजिक संघटनेच्या वतीने पानगांव येथे रक्तदान शिबिर संपन्न

WE MARATHA सामाजिक संघटनेच्या वतीने पानगांव येथे रक्तदान शिबिर संपन्न

मित्राला शेअर करा

सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्य करणारी WE MARARTHA ही सामाजिक संघटना कोणत्याही आर्थिक व्यवहार न करता राज्यात कोणत्याही भागात समाजबांधवांना अचानक येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणारी याच सोबत व्यवसायिक मार्गदर्शन करणारी संघटना आहे
कोरोना महामारीत आपल्या बंधू भगिनींना रक्तपुरवठा कमी पडू नये,कोणत्याही मेडिकल हेल्पविना कोणताही रुग्ण अडचणीत सापडू नये ही we maratha आम्ही मराठा ची टॅग लाईन स्मरून,आपण समाजाचे काही देणे लागतो या शिवविचाराने प्रेरित होऊन WE MARATHA आम्ही मराठा च्या सोलापूर जिल्हा टिम च्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा टीमने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले.

आणि ते पण फक्त चार दिवसात…

अनेक अडचणी,संकटे यांची तमा न बाळगता शिवरायांच्या मावळ्यांना शोभेल असे वाऱ्याच्या वेगाने हालचाली करून शिबीर यशस्वी.

आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर ह्या रक्तदान शिबिर महाआयोजनाची जबाबदारी घेवुन अथक मेहनत घेणाऱ्या सर्व टीम चे अभिनंदनआणि सर्व रक्तदात्यांचे संघटनेच्या वतीने मनस्वी धन्यवाद मानण्यात आले.

सोलापुर जिल्हा अ‍ॅडमिन यांनी संदर्भात माहिती माहिती दिली आम्हास आपला सार्थ अभिमान आहे.
या रक्तदान शिबिरासाठी करमाळा तालुका ऍडमिन विजय घरात बार्शी तालुका ऍडमिन अण्णा मोरे व रत्नदीप लोंढे
सांगोला तालुका ऍडमिन प्रकाश घाडगे यांनी खूप परिश्रम घेतले त्याबद्दल
प्रशांत संभाजीराव जाधव
सोलापूर जिल्हा ऍडमिन
We maratha – आम्ही मराठा( 9112033009) यांनी आभार मानले