Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > २०२२चे स्वागत एक कोटी रुपयांच्या देणगीने, संतोष ठोंबरे (काका) यांनी दिले बहुउद्देशीय संकुलासाठी एक कोटी रुपये

२०२२चे स्वागत एक कोटी रुपयांच्या देणगीने, संतोष ठोंबरे (काका) यांनी दिले बहुउद्देशीय संकुलासाठी एक कोटी रुपये

मित्राला शेअर करा

बार्शी, ऐ जिंदगी गले लगाले.. हमने भी तेरे हर एक गम को गलेसे लगाया है..हैना!..याच गाण्याशी आपली मैत्री जतन करण्यात २०२० आणि २०२१ ही वर्षे आपण पुढे ढकलली.काही तरी मार्ग निघेल,या आशेवर प्रत्येकजण धडपडत राहिला आणि आता आज आपली २०२२ सालाशी गळाभेट झालीय! तुम्ही-आम्ही आता तावून सुलाखून कात टाकलीय.स्वत:च्या आणि आपल्या अवती-भवतीच्या प्रत्येकाच्या जीवनाची घडी बसविण्यासाठी सज्ज झालो आहोत.नवा डाव मांडत आहोत.बार्शीच्या मात‌भूमी प्रतिष्ठान परिवारातील सदस्यांनीही असाच एक डाव मांडला..”जिथे कमी,तिथे आम्ही”,या ब्रिद वाक्याला नवा आयाम देण्यासाठी प्रत्येकजण पुढे सरसावला!

दररोज साडे तीनशे निराधार अबाल वृध्दांना दोन वेळ मोफत घास भरविणारी अन्नपूर्णा योजना, ऑक्सिजन सिलेंडर बँक, आरोग्य सेवा,गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण आणि जलसंधारण-पर्यावरणाला पूरक अशा सारख्या चाललेल्या कार्याला व्यापक बनविण्याचा निर्धार झाला.पुढील पिढ्यांनाही प्रेरणा आणि उभारी देणारे काम उभे करण्याचे स्वप्न उराशी घेऊन २१एकर जागेत मातृभूमीचे बहुउद्देशीय संकूल साकार करण्याचा निर्णय झाला.मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे? दान हे सत् पात्री असावे,हे तत्त्व आणि आपल्या घासातला घास समाजाला दिला पाहिजे या संस्काराने भारावलेले अनेकजण पुढे आले.पाहता पाहता लाखो रुपये जमा होवू लागले. मातृभूमीचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी संतोष ठोंबरे यांनी तर इतिहासच घडविला! तात्काळ एक कोटी रुपयांची देणगी त्यांनी प्रतिष्ठानला दिली.त्यांना बार्शीकर स्नेहीजन संतोषकाका असे संबोधतात!

काकांच्या कोटीची देण्याच्या कृतीने सर्वांनाच आश्चर्य आणि आनंदाचा धक्का दिला.खामगाव सारख्या खेड्यातील सामान्य शेतकऱ्याचा पोरगा लष्करात लष्करात जाण्याच्या ध्येयाने धडपड सुरु करतो.शारारिक शिक्षणाचा पदवीचा अभ्यास करतो.पण नशिबी मात्र शेतीत काम करणे येते.तिथेही शेतकरी मंडळा सारखे उपक्रम राबवून शेतीत नवे प्रयोग करीत राहतो.त्याच्या धडपडत्राला जीवनाच्या एक वळणावर उद्योजक बनतो. सातत्यपूर्ण प्रामाणिक परिश्रमाने यशस्वी तर होतोच,पण तिथेही नवा इतिहास घडवितो. सर्वाधिक कुबोटा ट्रॅक्टर विक्रीत विश्वविक्रम नोंदवितो! खेड्यातील एखादा तरुण मनावर घेतले तर काय करु शकतो,१०-१५वर्षाच्या प्रामाणिक परिश्रमाने आपल्या जीवनात स्वतः मानाने सक्षम बनून एक कोटी रुपयांची देणगी देण्यास समर्थ ठरु शकतो.

हे प्रेरणादायी वास्तव युवा पिढी ला समजावे म्हणूनच संतोषकाका ठोंबरे यांची पार्श्वभूमी आपल्या पुढे ठेवली. २०२२ या वर्षाला स्वगताची मिठी मारताना बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानचा संदेश आपल्याला नवा विचार, विश्वास, उत्साह आणि आपण एकटे नसल्याची भावना हत्तीचे बळ देईल.म्हणूनच तर म्हणावे वाटते,”मातृभूमी”प्रेमींनो! चला,२०२२चे स्वागत एक कोटी रुपयांच्या देणगीने करुया!!
नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ……….राजा_माने