Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > वन्यजीव रक्षक, सर्पमित्रांना ओळखपत्र मिळावे विमा, मेडिक्लेमही देण्याची वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनची मागणी

वन्यजीव रक्षक, सर्पमित्रांना ओळखपत्र मिळावे विमा, मेडिक्लेमही देण्याची वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनची मागणी

वन्यजीव रक्षक, सर्पमित्रांना ओळखपत्र मिळावे विमा, मेडिक्लेमही देण्याची वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनची मागणी
मित्राला शेअर करा

नसरापूर, ता. १३ : महाराष्ट्रातील

वन्यजीवरक्षक, सर्पमित्र जिवाची पर्वा न करता वन्यजीव व सर्प वाचविण्याचे काम करत आहेत. या सर्व वन्यमित्रांना वनविभागामार्फत ओळखपत्र मिळावे, अशी मागणी पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुशील विभूते यांनी केली आहे.

मागणीबाबत माहिती देताना सुशील विभूते यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अनेक वन्यजीवरक्षक व सर्पमित्र आहेत ते आपल्या जिवाची पर्वा न करता वन्यजीवांचे प्राण वाचवत आहेत. परंतु सर्प किंवा कोणताही वन्यजीव पकडताना त्याच्या जिवाला कोणत्याही प्रकारचा धोका झाला किंवा त्या

सर्पमित्राला आपला जीव गमवावा लागला तर त्याचे कुटुंब उघड्यावर पडत आहे. त्यासाठी महाराष्ट्र वनविभागाने वन्यजीवरक्षक, सर्पमित्रांचा जीवन विमा, मेडिक्लेम उतरवून वनविभागातर्फे अधिकृत ओळखपत्र द्यायला हवे, अशी आमची मागणी आहे.

कित्येक वर्षे सर्पमित्र साप वाचवत आहेत. लोकांमध्ये जाऊन सापांबद्दल जनजागृती करीत आहे. त्यामुळे सापांना मारण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. अनेक ठिकाणी पोपट, कासव, मोर डांबून ठेवले आहेत, ते प्राणी व पक्षी सोडविण्याचे काम सर्पमित्र करीत आहेत. चिंकारा, भेकर या प्राण्यांची शिकार करणाऱ्या व्यक्तींबद्दल वनखात्यास माहिती देत आहे.

यामुळे या वन्यजीवरक्षक व सर्पमित्रांचे अनेकांशी
स्थानिक पातळीवर वाद होतात. साप पकडताना अनेक सर्पमित्रांसोबत दुर्घटना घडल्यास स्वतःच्या खर्चाने उपचार करावा लागतो, वेळप्रसंगी आपला जीव गमवावा लागतो. त्यांना वनविभागामार्फत संरक्षण दिल्यास वन्यजीवरक्षक व सर्पमित्र म्हणून काम करण्यास अनेक तरुण पुढे येऊ शकतात. यासाठी शासनाने या मागणीबाबत गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रातील सर्पमित्रांना ओळखपत्र व विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केली आहे. याबाबत राज्यभरातील वन्यजीवरक्षक व सर्पमित्रांशी संपर्क साधून या मागणीबाबत जागृती चळवळ उभारणार असल्याचे अध्यक्ष सुशील विभूते यांनी सांगितले.