पण स्वच्छ बार्शी आणि सुंदर बार्शी करण्या साठी नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोलाच आहे. याचेच भान ठेवुन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सकाळी ६ ते ८ या वेळेत वृक्ष संवर्धन समिती तर्फे ५० महिला सफाई कामगार भगिनींचा शहरातील विविध भागात जाऊन गुलाब पुष्प देवुन सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांना २ सुंदर नॅपकिन्स तसेच १ अंगाचे साबण आणि १ कपड्याचे साबण या उपयोगी वस्तुही भेट देण्यात आल्या.

या वेळी बार्शी प्रेस क्लब चे अध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ,नगरपालिकेचे अरोग्य अधिकारी शब्बीरभाई वस्ताद, प्राचार्य दिलीप मोहिते, प्रा. शशिकांत धोत्रे सर आणि वृक्ष संवर्धन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन