जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. बार्शीतील जेष्ठ शल्य चिकित्सक डॉ. मिनाक्षी पाटील, जेष्ठ विधिज्ञ ॲड. प्रविणा पाटील आणि एम.आय.टी संकुलाचे प्राचार्य रेखा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी प्राचार्य डॉ. भारती रेवडकर संपादित “स्त्री आणि साहित्य : नोंदणी आणि निरीक्षणे ” या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या महिलांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानावर आधारित आंतरराष्ट्रीय जर्नलच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री शिवाजी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती आणि निवडणुक साक्षरता मंडळ यांच्या संयक्त विद्यमाने संरक्षणविषयक जाणीव जागृती आणि माझी वसुंधरा उपक्रमातील उपक्रमातील महिलांचा सहभाग अशा संकल्पनेवर आधारीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अॅड. प्रविणा पाटील यांनी, “संसारिक आणि सामाजिक जीवनात स्त्री ची भूमिका केंद्रस्थानी असल्यामुळे तीने कोणाच्या मेहरबानीवर विसंबून न राहता सक्षम होण्याची आवश्यकता असे प्रतिपादन करुन स्त्रीयांच्या हक्काच्या कायदेशीर तरतुदीबाबत सखोल मार्गदर्शन केले. तर डॉ. मिनाक्षी पाटील यांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांच्या निराकरणासाठी शिक्षण व्यवस्थेत लैंगिक शिक्षणाला महत्वाचे स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य रेखा पाटील यांनीही विद्यार्थीनींनी‘हम झुकेंगे नही’ च्या भूमिकेत राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. भारत बिचितकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करुन जागतिक महिला दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. प्रा. दामाजी भिसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर डॉ. सोमनाथ यादव यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. संध्या साळुंखे यांनी आभार मानले. प्रा. विजया जगताप यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. शेवटी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर