Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > चार एकर ‘लाल केळी’तून 35 लाखांचं उत्पन्न; करमाळ्याच्या उच्चशिक्षीत अभिजीतची यशोगाथा!

चार एकर ‘लाल केळी’तून 35 लाखांचं उत्पन्न; करमाळ्याच्या उच्चशिक्षीत अभिजीतची यशोगाथा!

चार एकर 'लाल केळी'तून 35 लाखांचं उत्पन्न; करमाळ्याच्या उच्चशिक्षीत अभिजीतची यशोगाथा!
मित्राला शेअर करा

अलिकडच्या काळात काही तरुण शेतकरी (Farmers) शेतीत नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत.

पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत भरघोस उत्पादन घेतायेत. तर काही उच्चशिक्षीत तरुण नोकरीच्या मागे न लागता यशस्वी शेती करतायेत. अशाच एका सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण (Civil Engineer) घेतलेल्या तरुणानं ‘लाल केळी’च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

अभिजीत पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालक्यातील वाशिंबे या गावात त्यांनी लाल केळीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे.

किलोला मिळतोय 55 ते 60 रुपयांचा दर लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला 55 ते 60 रुपयांचा दर मिळत आहे. चार एकर क्षेत्रावर 60 टन माल निघाला होता. यातून त्यांना खर्च जाऊन 35 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली. लाल केळी ही औषधी असते. त्यामध्ये पोषण गुणधर्म जास्त असतात. मेट्रो शहरामध्ये उच्च आणि श्रीमंत वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लाल केळीला मागणी आहे. तसेच मोठ मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देखील लाल केळीला मोठी मागणी असल्याचे पाटील यांनी सांगितले. पहिली चार एकर क्षेत्रावर लाल केळी होती. यावर्षी आणखी एक एकर क्षेत्रावरलाल केळीची लागवड केल्याचे पाटील यांनी सागंतले.