बार्शी:- सेवा समर्पण चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ संचलित दिव्यांग (अंध) संघाचे २० अंध व ५ सामान्य व्यक्ती आषाढी वारी निमीत्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी यवतमाळहून पायी निघाले आहेत. गेल्या १८ दिवसांपासुन एकमेकांचा हात धरून पांडुरंगाचे नामस्मरण करीत बार्शी येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे.

वारकरी संप्रदायात १३ व्या शतकापासून दिंडीची परंपराचालू असुन या इतिहासात आजपर्यंत अंधांची दिंडी कधी निघाली नसून सेवा समर्पण चॅरिटेबल ट्रस्ट च्या दिव्यांग संघाने या वर्षी पासुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रकल्प संयोजक सदानंद तायडे यांनी दिली.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक