
शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी इफको चा नॅनो यूरिया बाजारात या संदर्भातील एका अतिशय अपडेट महत्त्वाचं आहे त्या इफको च्या माध्यमातून करण्यात आलेले आहे ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नॅनो यूरिया प्रोडक्शन करण्यासाठी १ जून २०२१ पासून मान्यता देण्यात आलेली आहे.
इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया लाँच केला आहे.इफकोच्या ५० व्या वार्षिक बैठकीत याचं लाँचिंग करण्यात आले. सामान्य यूरियाची मागणी ५० टक्केहून कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचे लाँचिगं करण्यात आलं आहे.नॅनो यूरिया शेतकऱ्यांना लिक्विड स्वरुपात उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या ५०० मिलीमध्ये ४० हजार पीपीएम नायट्रोजन असतो. त्यामुळे यूरीयाच्या ५० किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून मिळतील.
स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार करण्यात आला असून कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये नॅनो लिक्विड यूरिया ची निर्मिती करण्यात आली आहे.नॅनो यूरिया शेतकऱ्यांना येणार्या मंगळवार पासून उपलब्ध होईल.नॅनो लिक्विड यूरियाची ५०० मिली बॉटल २४० रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल.नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
More Stories
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतासप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मराठा सेवा संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष मोळवणे, कोषाध्यक्षपदी कल्याण घळके