Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > आणखी... > कुक्कडगांव येथे विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

कुक्कडगांव येथे विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

मित्राला शेअर करा

जेकटेवाडी : परंडा तालुक्यातील कुक्कडगांव येथे विश्वजन आरोग्य समिती,विश्व मराठा संघ धाराशिव व श्री पंढरी मेडिकल,अमोल वायसे पाटील व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर विश्वजन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा छायाताई भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सरपंच शाहिस्ता अमीर शेख यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले यावेळी विश्वजन आरोग्य सेवा समितीचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष विश्व मराठा संघ धाराशिव सोमनाथ कोकाटे, विश्व मराठा संघ महिला जिल्हाध्यक्षा अर्चना समाधान माने, विश्व मराठा संघ महिला भुम तालुकाध्यक्ष योगिता मिसाळ, विश्व मराठा संघ तालुकाध्यक्ष परमेश्वर रसाळ, आरोग्यदुत राहुल शिंदे, आरोग्य परंडा तालुका समन्वयक साजीद शेख, विश्व मराठा संघ जिल्हा उपाध्यक्ष तानाजी कासारे,विश्व मराठा संघ तालुकाध्यक्ष रावसाहेब काळे, तालुका समन्वयक किशोर गटकळ, आरोग्य समन्वयक परंडा सदस्य रविंद्र तांबे,रोजगार सेवक बालाजी पाटुळे,भरत मिसाळ पाटसांगवी, पोलिस पाटील विनोद निरवणे आदीसह नागरिक उपस्थित होते.