कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना आधार मिळणार आहे. कारण कोरोना काळात ज्या कुटुंबाने आपल्या घरातील सदस्य गमावला, अशा कुटुंबाला सरकारकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल,अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
मध्य प्रदेशात आतापर्यंत ७ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. त्या सर्वांच्या कुटुंबियांना मध्य प्रदेश सरकार १ लाख रुपयांची मदत करणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरूवारी संध्याकाळी ही घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ४ मोठ्या घोषणा केल्या.
यात कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागलेल्या रुग्णांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिलाय. तसेच ज्या घरातील कर्ता माणूस गेला त्या कुटुंबाला पेन्शनचीही घोषणा केली आहे.
ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख आहे. संकटाच्या काळात मदत म्हणून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपये देणार. तसेच ज्या कुटुंबातील कमावती व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय त्या कुटुंबांना दरमहा २५०० रुपयांची पेन्शन दिली जाणार,असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
विश्वसनीय बातम्या अणि माहिती
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद